ताज्या बातम्या महाराष्ट्र

यालाच रामराज्य म्हणायचे काय? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

नागपूर येथील रामटेक येथे गडमंदिर शोभायात्रेत सामील झाल्याने एका दलित युवकाची हत्या (murder of Dalit youth) होते. मारहाणीत मुस्लीम तरूण जखमी होतो. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. ‘ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी असून यालाच रामराज्य म्हणायचे काय? असा संतप्त सवाल करत सरकारला सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना संताप व्यक्त केला. त्याचबरोबर या घटनेची एसआयटी मार्फत (SIT) चौकशी करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली.

वडेट्टीवार म्हणाले, छ. शिवाजी महाराज (Shivaji Maharaj), महात्मा फुले (Mahatma Phule), राजर्षी शाहू महाराज (Shahu Maharaj), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. थोर संतांची, समाजसुधारकांची शिकवण महाराष्ट्राला मिळाली आहे. तरीही अशा घटना वारंवार घडत आहेत हे दुर्दैवी आहे. यापूर्वी बीड येथील पारधी समाजाच्या महिलेला विवस्त्र करून मारहाण केली गेली. शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. त्यानंतर आता ही रामटेक येथील दलित तरूणाची हत्या झाली. मुस्लीम तरूणाला मारहाण झाली. अशा एकामागून एक घटना घडत असताना सरकार मात्र गप्प असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

अशा घडना घडू नयेत म्हणून सरकारकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. दलित, आदिवासी बांधव सुरक्षित नाही. सरकार दलित, आदिवासींच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही. समाजकंटकांना कायमची अद्दल घडविण्याचा दम सरकारमध्ये नाही. म्हणून अशा घटनेत वाढ होताना दिसत आहे, अशा कठोर शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यातील काही समाजात जर भीतीचे वातावरण असेल तर हिंदुत्वाच्या गप्पा मारून उपयोग नाही. रामटेक येथे विवेक खोब्रागडे  व त्याचा मित्र फैजान खान यांना झालेल्या मारहाणीत विवेकचा मृत्यू झाला. फैजान गंभीर जखमी आहे. या दोघांच्या कुटुंबाला झालेल्या यातना, या कुटुंबावर झालेले हे आघात याला सरकार जबाबदार आहे. जातीय विषाची पेरणी झाली त्यातून हे सगळ उगवल आहे का? असा सवाल करत सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात