मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वर्षा निवासस्थानी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राज यांच्यासोबत मनसेचे आमदार राजू पाटीलही होते.
राज ठाकरेंचं टोलचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनसेने मराठी पाट्यांचं आंदोलन हाती घेतलं आहे. राज्यभरात दुकानदारांनी मराठी पाट्या लावाव्यात म्हणून मनसेने हे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर ही भेट होत असल्याचंही सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत टोलच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आबे. मनसेच्या आंदोलनानंतर सरकारने काही निर्णय घेतले, मात्र त्याच कमतरता असल्याचं सांगितलं जात आहे.
तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आताच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका आणि त्याच्या मतदानोत्तर चाचण्या. पाच राज्यात काही ठिकाणी भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
 
								 
                                 
                         
                            
