Twitter : @therajkaran
नागपूर
आजपासून नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू झाले आहे. या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अधिवेशनासोबत शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवरील सुनावणी (Hearing on Disqualification of MLAs) सुरू राहणार आहे. यात शिंदेंसोबतच्या अनेक आमदारांची उलटतपासणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार अपात्रता
याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker Rahul Narwekar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री उशिरा नऊ वाजेपर्यंत सुनावणी घेतली जाणार आहे. नार्वेकरांना यासाठी ओव्हरटाइम करावा लागणार आहे. मुंबईनंतर आता नागपूरात यावर सुनावणी घेतली जाणार आहे.
कोणत्या आमदारांची उलट तपासणी होणार?
- भरत गोगावले
- दीपक केसरकर
- गुलाबराव पाटील
- तानाजी सावंत
- दादा भुसे
- संजय राठोड
- योगेश कदम