नागपूर
महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतील हरहुन्नरी कलाकार प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) यांच्या पहिल्या वहिल्या ‘एकदा येऊन तर बघा…’ या चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याचा मुद्दा अधिवेशन मांडण्यात आला. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रसाद खांडेकर या कलाकाराच्या चित्रपटाला थिएटर मिळावे यासाठी योग्य ती पावलं उचलली जावीत अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तत्काळ कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतील लेखक आणि अभिनेता प्रसाद खांडेकर यांचा ‘एकदा येऊन तर बघा…’ हा पहिला चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याच्या चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याचा मुद्दा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अधिवेशनात मांडला. मराठी कलाकाराने केलेल्या कामाला न्याय मिळायला हवा यासाठी प्रसादच्या चित्रपटाला थिएटर मिळावे अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली. फडणवीसांनी यावर तत्काळ कारवाईचे आदेश दिले असून त्याला थिएटरही उपलब्ध करून दिलं जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
एकदा येऊन तर बघा हा विनोदी चित्रपट असून यात मराठीतील अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहे. सयाजी गायकवाड, तेजस्विनी पंडीत, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, भाऊ कदम, ओंकार भोजणे यांसारखे कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत.