ताज्या बातम्या महाराष्ट्र

आमदार अपात्रता प्रकरण : ‘त्या’ तिघांवर कारवाई नाही, उद्धव ठाकरे गट उद्या कोर्टाचं दार ठोठावणार

Twitter : @therajkaran

मुंबई

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde Sena) शिवसेनेतील विधान परिषदेचे आमदार अपात्रता (disqualification of MLAs) प्रकरणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. विधान परिषदेचे सदस्य विप्लव बजोरिया, मनिषा कायंदे आणि निलम गोऱ्हे यांच्यावर कारवाईबाबत विधीमंडळात हालचाल होतं नसल्यामुळे उद्धव ठाकरे गट (UBT Shiv Sena) कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हायकोर्टात ठाकरे गटाकडून शुक्रवारी याचिका दाखल करण्यात येणार आहे. उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावरील कारवाई बाबत ठाकरे गटाने केलेल्या मागणीच्या कायदेशीर प्रक्रियेबाबत विधीमंडळाकडून माहिती घेतली जात असल्याचं सांगितलं जात आहे. निलम गोऱ्हे वगळता ठाकरे गटाकडून इतर दोघांबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात