यवतमाळ
यवतमाळच्या उमरखेड पोलीस ठाण्यात भाजपाच्या नितीन भुतडांच्या तक्रारीनंतर अखेर खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल (A case has been registered against MP Sanjay Raut) करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘सामना’ या वृत्तपत्रातून देशविरोधी व्यक्तव्य करून देशद्रोहाचा गुन्हा करित देशाचे पंतप्रधानांची बदनामी केल्याचा आरोप करित भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI/status/1734462813022847202
कलम 153 A, 505(2) आणि 124 – A नुसार खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.