ताज्या बातम्या महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गडचिरोली व बुलढाणा येथे प्रसूतीदरम्यान महिलांचा मृत्यू, विजय वडेट्टीवार यांचा सरकावर हल्लाबोल

विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार. रामटेक देवस्थान विधेयकावर चर्चा करताना विरोधकांनी राजकीय व्यक्तींना विश्वस्त न नेमण्याची मागणी केली.

नागपूर

गडचिरोली व बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याला आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करत वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

विधानसभेत प्रशोत्तराच्या तासादरम्यात झालेल्या चर्चेत श्री. वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढत जोरदार हल्लाबोल केला.

गडचिरोली शहरातील जिल्हा स्त्री व बालरूग्णालयात सिझेरियन प्रसुतीनंतर रजनी प्रशांत शेडमाके व उज्वला नरेश बुरे या दोन महिलांचा डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालय व अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही ठिकाणी उपचारासाठी आलेल्या विद्या निलेश गावंडे या तरुणीचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. या प्रकरणी कडक कारवाईची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात