नवी दिल्ली
प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी लोकसभेत उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे लोकसभेतील सुरक्षा व्यवस्थेबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. सुदैवाने दोघांना पकडण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात आहे.
या घटनेनंतर काही वेळासाठी लोकसभेत गोंधळ उडाला. त्या वेळी लोकसभेत जनहिताच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा सुरू होती. पश्चिम बंगालचे भाजप खासदार स्वगेन मुर्मु आपलं म्हणणं मांडत होते. अचानक झालेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. यानंतर तातडीने अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभेची कार्यवाही दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित केली.
एएनआयनच्या वृत्तानुसार, दोघांनी कथितपणे गॅस उत्सर्जित करणारं साहित्य खाली फेकलं. अधिक माहितीची अद्याप प्रतीक्षा आहे. एका तरुणाला लोकसभेच्या बाहेर काढले असता त्याच्या बुटांमधून पिवळा धूर निघत होता. त्यामुळे जवळच वायू पसरला. हा गॅस कोणता होता, याचा तपास सुरू आहे. संसदेवरील हल्ल्याला आजच 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर सवाल उपस्थित केले जात आहेत.