मुंबई
धारावीच्या पुनर्विकासाबाबत महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. धारावीच्या विकासावरून उद्धव ठाकरेंनी अदानींविरोधात मोर्चा काढत राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावर राज ठाकरेंनी वक्तव्य (Raj Thackeray attack on Uddhav Thackeray) केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, अदानींसोबत यांची सेटलमेंट झालेली नाही.
आठ महिन्यांनंतर मोर्चा का?
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले की, सर्व प्रकल्प अदानींना का दिले जात आहेत. पोर्ट आणि एअरपोर्ट सर्व अदानींचे आहेत. हा प्रकल्प तब्बल ८ महिन्यांपूर्वी अदानींना देण्यात आला. मात्र महाविकास आघाडीने आताच का मोर्चा काढला. असं दिसतय अदानींसोबत यांचं सेटलमेंट झालेलं नाही.
काय म्हणाले राज ठाकरे…
अदानींकडे असं काय आहे कि विमानतळापासून ते झोपडपट्टी पुनर्वसनापर्यंतचे सर्व प्रकल्प त्यांनाच मिळतात… भारतात दुसऱ्या मोठ्या कंपन्या नाहीत का? आणि १० महिन्यांपूर्वीच धारावीचा प्रकल्प अदानींकडे गेल्याचं घोषित झालं होतं मग महाविकास आघाडीला आत्ताच अदानींना विरोध करावासा का वाटला ?
 
								 
                                 
                         
                            
