शिरूर
आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करणारच असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल केला होता. विशेष म्हणजे प्रण घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार शिरूर मतदारसंघात विकासकामाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या कामाचा झपाटा पाहायला मिळाला. यावेळी विकासकामाची पाहणी करताना चेतन तुपेही उपस्थित होते.
शरद पवार गटाकडून अमोल कोल्हेंना शिरूर मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. येथे शिवसेना शिंदे गट यांच्याकडून शिवाजीराव आढळराव इच्छूक आहेत. आढळराव २०१४ मध्ये शिवसेनेकडून या मतदारसंघाचे खासदार राहिलेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आढळरावांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली जाते किंवा महाविकास आघाडीकडून इतर कोणाचं नाव पुढे केलं जातं हे लवकरच समोर येईल.
अजित पवार म्हणाले…
- शिरूर मतदारसंघातील 40 कोटींच्या विकासकामं करायचा प्लान
- कालच्या चॅलेंजचा आणि आजच्या पाहणीचा काहीही संबंध नाही.
- येथील रेल्वेच्या उड्डाणपुलाचं काम 2017 पासून सुरू आहे. हे काम लवकरात लवकर व्हावं यासाठी प्रयत्न