ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मुदतवाढ नाहीच; नितीन करीर यांना लॉटरी

By Anant Nalavade 

X : @NalavadeAnant

मुंबई

येत्या ३१ डिसेंबरला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक सेवानिवृत्त होत असले तरी त्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ म्हणजेच लोकसभा निवडणुकीपर्यंत द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठविला आहे. असे जरी असले तरी केंद्र सरकार त्याला अनुकूल नसल्याची खात्रीलायक माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.  

याबद्दल अधिक माहिती घेता असे कळले की, भलेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तरी तेही एखादा धोरणात्मक निर्णय घेताना नेहमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करुन घेतात. पण फार क्वचित ते फडणवीस यांना गृहीत न धरता परस्पर निर्णय घेतात. असाच एक निर्णय फडणवीस विदेश दोऱ्यावर असताना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून घेतला होता आणि त्याचा अनपेक्षित पण मोठा फायदा मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला झाला. 

तसे फडणवीस यांचे नेटवर्क नेहमी छोट्या मोठ्या हालचालींवर अँक्शन मोड वर असते. जेंव्हा त्यांच्या सूत्रांनी ही माहिती त्यांना विदेशात कळवली तेंव्हाच त्यांनी सौनिक यांना टार्गेट करायचे ठरवले होते. पण ती वेळ येत नव्हती. पण उद्या ३१ तारखेला सौनिक हे सेवानिवृत्त होत आहेत. आणि फडणवीस यांना माहीत आहे की मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मुदतवाढ वाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे. त्यामुळें त्यांनीही वेगाने चक्र हलवत आपले मत सध्या वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या पारड्यात टाकले आहे. 

 तसं बघायला गेले तरं जी दोन नावे मुख्य सचिव पदासाठी रिंगणात आहेत त्यात अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक व राजेश कुमार यांच्यापेक्षा करीर हे त्यांना सिनियर आहेत. त्यातही सर्वांशी जुळवून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. सर्वात जास्त महत्वाचे म्हणजे ते मितभाषी असून त्यांनी आजपर्यंत १९९५ ते २००२ पर्यंत प्रशासनातले महत्त्वाचे समजले जाणारे नगरविकास खाते, व त्यानंतर अनेक वर्षे महसूल विभागाचा कार्यभार सांभाळला आहे. 

तसेच मंत्रालयातील सामान्य शिपाई ते अगदी अधिकाऱ्यांना त्यांची प्रतिमा उजळ आहे. एकंदरीत सर्वांना समजून, सामावून घेण्याची त्यांची आजवरची कारकिर्द असल्याने त्यांचीच खरं तरं मुख्य सचिव पदावर नेमणूक होईल असा दावाही या अधिकाऱ्याने केला. अशात आता सात ते आठ महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला असून वित्त विभागही त्यांच्याच कडे आहे. 

त्याच विभागांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नितिन करीर यांचे अगदी चांगले ट्युनिंग अजितदादा यांच्या सोबत असल्याने त्यांनीही आपले मत करीर यांच्याच पारड्यात मुख्य सचिव पदासाठी टाकले आहे. त्यामुळे उद्या जर का मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांच्या नावाची घोषणा झाल्यास त्यात आश्चर्य वाटून घेण्यासारखे काही नाही, असेही या अधिकाऱ्यांनी छातीठोकपणे सांगितले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात