सिल्लोड
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्ता यांच्या वाढदिवसानिमित्ताने गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. त्यात काही हुल्लडबाज करणारी तरुण मंडळीही होती. अब्दुल सत्तारांनी भर स्टेजवरून त्या मुलांना मारण्याचे आदेश दिले. यासंदर्भातील एक व्हिडीओ अतुल पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये अब्दुल सत्तार अपशब्दाचा वापर करीत असल्याचे दिसत आहे. अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार केला. धक्कादायक म्हणजे कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरडं मोडा असेही सत्तार म्हणाले. या व्हिडीओनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सुरू केलं आहे.
अतुल लोंढेंनी अब्दुल सत्तारांचा व्हिडीओ केला ट्विट…पाहा – https://twitter.com/atullondhe/status/1742772070319309064/history
अखेर अब्दुल सत्तारांनी वापरलेल्या अपशब्दाबद्दल मागी मागितली. आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी हुल्लडबाजी केल्याचा आरोप केला आहे. त्यावेळी कार्यक्रमात मोठी गर्दी होती, याशिवाय महिला आणि तरुणींचाही समावेश होता.
त्यांच्या सुरक्षेचा विचार करताना गावाकडच्या भाषेतून माझ्याकडून काही शब्द वापरले गेले, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.