मुंबई
आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावरुन शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून हल्ला केला जात आहे.
दरम्यान शरद पवारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत असतील तर शंकेला वाव आहे. राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपायला हवी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
विधानसभेत एका पक्षाला स्पष्ट बहुमत आहे ही स्थिती नव्हती. त्यात विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेट असल्यास संशयाला वाव आहे, असं पवारांची स्पष्ट केलं. आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवी शिंदे-नार्वेकर यांच्या भेटीवर बोट ठेवले. आम्ही दाखल केलेल्या प्रकरणात एकनाथ शिंदे पहिल्या क्रमांकावरील आरोपी आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष जे या प्रकरणात न्यायमूर्ती आहेत, त्यांनी आरोपीची भेट घेणं कायदेशीर नसल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. दोघांच्या भेटीमागे काही मिलिभगत आहे का, असाही संशय त्यांनी व्यक्त केला.