ताज्या बातम्या महाराष्ट्र

युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत 2 दिवस पोलीस कोठडीत, मोदींच्या पोस्टरवर काळं फासल्याचा आरोप

नागपूर

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळं फासल्या प्रकरणी राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरवर काळ फासल्याप्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी राऊतांना अटक केली होती. आज सोमवारी सत्र न्यायालयाने कुणाल राऊतांना दिलासा न देता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर बँक घोटाळ्यातील आरोपी सुनील केदार यांचा फोटो असल्याचा प्रकार घडला होता. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे, म्हणून अर्थसंकल्पाच्या पुस्कावर काँग्रेसच्या सदस्यांनी केदार यांचा फोटो छापला होता. यावरुन मोठा वाद झाला होता. भाजप सदस्यांच्या या प्रश्नावर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती.

कुणाल राऊत कोण आहेत?
उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे कुणल राऊत यांचा जनम १७ फेब्रुवारी १९८९ रोजी झाला. विद्यार्थी दशेत असल्यापासून त्यांना राजकारण आणि समाजकारणात रस होता. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याची सुरुवात केली. यानंतर ते काँग्रेसच्या युवा काँग्रेसमध्ये सामील झाले. २०१८ च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात