बारामती
आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. आजचा दिवस राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा असणार आहे. दुसरीकडे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. आजपासून शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. १५, १६ आणि १७ फेब्रुवारीपर्यंत शरद पवार बारामती मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. यानंतर १८ तारखेला शरद पवार पुरंदर दौऱ्यावर आहेत.
आमदार अपात्रता निकालात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अपात्र होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज सायंकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याचा निकाल जाहीर करतील. १५, १६ आणि १७ फेब्रुवारीपर्यंत बारामती दौरा, १८ तारखेला पुरंदर दौरा आणि यानंतर २१ तारखेला शरद पवार आंबेगाव दौऱ्यावर आहेत. आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघात आहे. कधीकाळी दिलीप वळसे पाटील शरद पवार यांचे विश्वासू समजले जात होते.
आज राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणावर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष आज सायंकाळी हा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नव्हतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत वेगळा निकाल लागू शकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अपात्र झाले तर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ होऊ शकते.
अजित पवार राष्ट्रवादी फोडून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकमेकांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकालासाठी वाढवलेली मुदत आज संपत असून विधानसभा अध्यक्ष आज आपला निकाल जाहीर करतील