X : @therajkaran
मुंबई: राज्य विधीमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.
‘कापसाला प्रतिक्विटंल १४ हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे’, अशी मागणी विरोधी सदस्य करत होते. यावेळी विरोधी सदस्यांनी गळ्यात कापसापासून बनवलेले हार घातले होते. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक विरोधी आमदार या वेळी हातात कापसाची माळ आणि गाजरे घेऊन सरकार विरोधात घोषणा देत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात जाताना आंदोलक विरोधकांच्या हातातील फलकांची पाहणी करत आपले लक्ष आहे, याची जाणीव करून दिली.