ताज्या बातम्या महाराष्ट्र

रवींद्र वायकर यांचे नाव भारतीय कामगार सेनेच्या बोर्डावरुन मिटवले

X: @therajkaran

मुंबई: शिवसेना आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. ज्या सेनेतून मोठे झाले त्याच सेनेला विसरून गट बदलत असल्याची प्रतिक्रिया सामान्य शिवसैनिक व्यक्त करत आहेत. वायकर हे जोगेश्वरी मतदार संघातील असल्याने त्याच मतदारसंघात येणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातील भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार सेनेच्या बोर्डावर असणारे वायकर यांचे नाव मिटवून टाकले आहे.

शिवसेना उबाठा गट युवा सेनेचे उपविभाग अधिकारी तसेच भारतीय कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य समीर राणे आणि संतोष सावंत यांनी वायकर यांच्यासहित त्यांच्या सोबत जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे मिटविण्यात आली असल्याचे सांगितले.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात