X: @therajkaran
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने आज दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) आणि सुखबीर संधू (Sukhbir Singh Sandhu) यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले. या नावावर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंतिम निर्णय घेतील. त्यानंतर अधिसूचना काढण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जाहीर होण्यापूर्वी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. ज्ञानेश कुमार हे केरळमधील तर सुखविंदर संधू हे पंजाबमधील आहेत. सुखबीर संधू हे उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि NHAI चे चेअरमन राहिले आहेत. ज्ञानेशकुमार १९८८ बॅचचे केरळचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते गृह मंत्रालयात होते. कलम ३७० संदर्भात निर्णय घेताना ते गृह मंत्रालयात होते. दरम्यान, या प्रक्रियेसंदर्भात आपण असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.
निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी नवीन नियुक्तीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयुक्त पदासाठी आपल्याकडे २१२ नावे एका दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे रात्रभर मी विचार करत राहिलो. दुसऱ्या दिवशी सहा नावे माझ्याकडे दिली गेली. त्यामुळे आपण असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची नावे समितीने निश्चित केली आहे, असे त्यांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये अनुप पांडे यांच्या निवृत्तीनंतर आणि गोयल यांच्या राजीनाम्यानंतर, तीन सदस्यीय निवडणूक आयोगामध्ये आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार राहिले होते. गोयल, ज्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत होता, परंतु त्यांनी 9 मार्च रोजी राजीनामा दिला. त्यानंतर नवीन नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला.