ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेजवळ उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

जम्मू – काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे स्थापण करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी २० ऑक्टोबरला राजभवन येथे करून हा पुतळा कुपवाडाच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे. ही घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी बुधवारी मंत्रालयात केली.

मुनगंटीवार यांच्या सहकार्यातूनच “आम्ही पुणेकर” (Aamhi Punekar) या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात येत आहे. राजभवनात होणाऱ्या कार्यक्रमात “आम्ही पुणेकर” संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव आणि विश्वस्त अभयराज शिरोळे हे या उपक्रमाविषयी माहिती देणार आहेत. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapti Shivaji Maharaj statue) अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाला सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (Maratha Light Infantry) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे (Abhayraj Shirole) यांच्या हस्ते यावर्षीच्या २० मार्च रोजी पार पडले होते. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ टिकून राहील, असा बनवला गेला आहे. या संस्थेतर्फे कुपवाडा येथे भारतीय सैन्यासोबत विविध दीर्घकालीन उपक्रम प्रस्तावित असून त्याची माहिती संस्थेतर्फे पत्रकारांना दिली जाईल, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईतील राजभवनातून रवाना होणारा छत्रपतींचा हा पुतळा बडोदा, दिल्लीमार्गे रस्त्याने प्रवास करून साधारण दहा ते बारा दिवसात कुपवाडा येथे पोहोचेल. वाटेत बडोदा येथे आणि नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan, New Delhi) या पुतळ्याचे स्वागत-पूजन स्थानिक नागरिकांतर्फे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाटेत ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचे स्वागत विविध संस्था व स्थानिक नागरिक करणार आहेत, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे