पुणे
शेतकरी आक्रोश मोर्चानिमित्ताने खासदार अमोल कोल्हे सध्या गावागावांमध्ये फिरत आहेत. महाविकास आघाडीचा हा मोर्चा शिवनेरीपासून सुरू झाला आहे.
कांदा निर्यात बंदी, दुधाचे कोसळलेले दर यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. शिरूरमध्ये जात असताना जातेगाव येथे एका वृद्ध आजीने खासदार अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला आणि भाकरीचा तुकडा-चटणी भरवलं त्यांचं तोंडभरून कौतुक केलं.
गावकऱ्यांनी दिलेलं प्रेम पाहून अमोल कोल्हेही भारावले. यावेळी अनेक महिलांनी त्यांचं औक्षण केलं. वृद्ध आजीने त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावरुन हात फिरवला.. कसा आहेत बाबा उन्हातान्हात फिरतोस.. किती शेतकऱ्यांची काळजी करतोय असं म्हणून ईश्वर तुझं भलं करो असा आशीर्वाद दिला. सोबत कापडात गुंडाळलेली चटणी-भाकरीच्या शिदोरीचं गाठोडं दिलं. आणि भाकरीचा तुकडा आणि चटणी खाऊ घातली.
हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असल्याची भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. शेतकरी आक्रोश मोर्चाचा प्रवास हा असंख्य अनुभवांनी भारावून टाकणारा आहे. माता भगिनींचे असंख्य आशीर्वाद, त्यांच्या हाताने भारावलेला मायेचा घास आणि खूप साऱ्या शुभेच्छा हे सारं शब्दांच्या पलीकडचं आहे. युष्यात चढ उतार असंख्य येतील पण या आशीर्वादांचं वैभव सदैव गाठीशी असेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.