मुंबई – अमृतसर येथील सुवर्णमंदिर परिसराजवळ उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
रामदास आठवले यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. पुतळ्याच्या विटंबनेच्या पाठीमागे कोणाचा कट आहे, हे शोधण्यासाठी सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
#Watch : अमृतसरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या विटंबनेचा तीव्र निषेध. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी : रामदास आठवले, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.#BabasahebAmbedkar @RamdasAthawale pic.twitter.com/fDTTLoxp8I
— rajkaran (@therajkaran) January 27, 2025
रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंजाब व महाराष्ट्रात या घटनेचा तीव्र निषेध नोंदवावा, असे आवाहन आठवले यांनी केले. या संदर्भात ते 2