मुंबई : कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधित आस्थापनांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.
या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. चर्चेत विजय वडेट्टीवार व राहुल पाटील यांनीही सहभाग घेतला.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, “राज्यात कर्करोग निदान वेळेवर व्हावे आणि रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी ८ कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन्स खरेदी करण्यात आल्या आहेत. या खरेदीसाठी जेम पोर्टलवर स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. प्रत्येक व्हॅनमध्ये ४४ वैद्यकीय उपकरणांसह सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत.”
खरेदी प्रक्रियेबाबत लोकप्रतिनिधींनी निवेदने दिली असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, “आरोग्य सेवा आयुक्तांच्या वतीने सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, चालू अधिवेशन संपण्यापूर्वीच त्याचा अहवाल सादर केला जाईल.