ताज्या बातम्या राष्ट्रीय

देशात मोदींविरोधी लाट? काँग्रेसच्या दावा अन् आकडेवारींचं सत्य, पाहा स्पेशल रिपोर्ट

काँग्रेसने केलेल्या Anti incumbency चा दावा फोल; 2018 आणि 2023 ची आकडेवारी काय सांगते?

नवी दिल्ली

विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशाची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला छत्तीसगड आणि राजस्थानातील आपली सत्ताही कायम ठेवता आली नाही आणि पराभवाचा सामना करावा लागला. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसकडून Anti incumbency म्हणजेच सत्ता विरोधी लाट असल्याचा दावा केला जात होता.

मात्र प्रत्यक्षात परिस्थिती Anti भाजप नव्हे तर Pro असल्याचं दिसून आलं. 2018 च्या विधानसभा निवडणुकीतील भाजप आणि काँग्रेसच्या मतदानाच्या टक्क्यांची तुलना केली असता प्रत्यक्षात काँग्रेसचा दावा फोल ठरल्याचं दिसून येत आहे. उलटपक्षी मध्यप्रदेशमध्ये भाजपने मोठी मजल गाठल्याचं दिसून येत आहे. जाणून घेऊया आकडेकारी नेमकं काय सांगते…

छत्तीसगडमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 33.06% मतदान तर काँग्रेस 43.09% मतदान झालं होतं. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत तब्बल 13.21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हीच परिस्थिती मध्य प्रदेशातही दिसून येते. 2018 मध्ये मध्य प्रदेशात भाजपला 41.06% मतदान झालं होतं. यात तब्बल 7.49 टक्क्यांची वाढ झाली असून हा आकडा 48.55% पर्यंत पोहोचला आहे.

राजस्थानात 2018 च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखी होती, यंदा मात्र भाजपला काही प्रमाणात अधिक मतदान झालं आहे. तेलंगणात भाजपला सत्तास्थापनेजवळ जाता आलं नसलं तरी भाजपच्या मतांच्या टक्केवारीत तब्बल दुप्पटीने वाढ झाल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. विशेष म्हणजे बीआरएसला फटका बसला असून काँग्रेसच्या टक्केवारीत तब्बल 11.33 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मतांची टक्केवारी :

छत्तीसगड : 2018
काँग्रेस – 43.09%
भाजप – 33.06%

छत्तीसगड : 2023
काँग्रेस – 42.23%
भाजप – 46.27%
——————-
मध्य प्रदेश : 2018
काँग्रेस – 41.05%
भाजप – 41.06%

मध्य प्रदेश : 2023
काँग्रेस – 40.40%
भाजप – 48.55%
——————-
राजस्थान : 2018
काँग्रेस – 39.08%
भाजप – 39.03%

राजस्थान : 2023
काँग्रेस – 39.53%
भाजप – 41.69%
——————–
तेलंगणा : 2018
काँग्रेस – 28.07%
भाजप – 6.10%

तेलंगणा : 2023
काँग्रेस – 39.40%
भाजप – 13.90%

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे