ताज्या बातम्या राष्ट्रीय

ED च्या चौकशीला अरविंद केजरीवालांची दांडी, विपश्यनेसाठी कालच रवाना; आता 10 दिवसांनी परतणार!

नवी दिल्ली

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश असताना ते आज उपस्थित राहू शकणार नसल्याचं समोर आलं आहे. ते कालच 10 दिवसांच्या विपश्यनेसाठी गेले आहेत. त्यांना मंगळवारीच (Arvind Kejriwal’s Absence to ED Inquiry, Left for Vipassana Yesterday) विपश्यनेसाठी जायचं होतं, मात्र इंडिया आघाडीची बैठक असल्याने त्यांनी हा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला.

ईडीच्या दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी सोमवारी त्यांना समन्स पाठवण्यात आलं होतं, आणि गुरुवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश होते. अद्याप केजरीवाल यांच्या वकिलांनी ईडीच्या नोटीसांबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते आज गुरुवारी ईडीसमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वकिलांचा सल्ला घेतल्यानंतरच केजरीवाल यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्याऐवजी विपश्यनेला जाण्याचा निर्णय घेतला. वकिलांनी यंदाही ईडीच्या समन्समध्ये काही चुका असल्याचं सांगितलं आहे आणि त्यांच्याकडून गुरुवारी याबाबत खुलासा केला जाण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाने ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षाचे वकिल समन्सचा अभ्यास करीत आहेत आणि कायदेशीर योग्य ते पाऊल उचलतील. याशिवाय आपच्या नेत्यांनी सांगितलं की, केजरीवालांचा विपश्यनेला जाण्याचा कार्यक्रम आधीच ठरवलेला होता.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे