नवी दिल्ली
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्ली जल बोर्ड (डीजेबी) मधील कथित अनियमिततेच्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार आणि आम आदमी पार्टीशी संबंधित काही लोकांच्या परिसराची झडती घेण्यात आली. एका वृत्त माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्याचा एक भाग म्हणून दिल्ली, चंदीगड आणि वाराणसीमधील 12 हून अधिक भागांची झडती घेतली जात आहे.
बिभव कुमार, दिल्ली जल बोर्डाचे माजी सदस्य शलभ कुमार, पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष एनडी गुप्ता यांच्या कार्यालयासह इतरांच्या परिसराची झडती केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे.
ही कारवाई दिल्ली जल बोर्डाच्या कंत्राट प्रक्रियेतील कथित अनियमिततेशी संबंधित आहे. याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या आठवड्यात निवृत्त मुख्य अभियंता जगदीश कुमार अरोरा आणि कंत्राटदार अनिल कुमार अग्रवाल यांना अटक केली होती. विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा) न्यायालयाने सोमवारी त्यांच्या कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली.
अंमलबजावणी संचालनालयाने दावा केला की मोठा कट उघड करण्यासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आम्ही घाबरत नसल्याचे दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. अद्याप एक रुपयाही समोर आलेला नाही. अद्याप कोणताही पुरावा सापडलेला नाही. सरकारी साक्षीदार म्हणून आरोपींचा वापर करून ईडीचा संपूर्ण खटला सुरू आहे.
ईडीने ही सर्व विधाने फसवणूक करून घेतल्याचे मी आज उघड करणार आहे. एका साक्षीदाराने सांगितलं, ईडीच्या लोकांनी त्याला इतकी जोरात कानशिलात लगावली की, त्याच्या कानादा पडदा फाटला. एका साक्षीदाराने सांगितलं, तुम्ही नेत्यांच्या विरोधात वक्तव्य केलं नाही तर त्याचे परिणामा भोगावे लागती. तुमची मुलगी कॉलेजमध्ये कशी जाते, ते राहून लोकांना धमकावून खोट्या निवेदनावर सह्या करायला सांगण्यात आल्याचा खुलासा एका साक्षीदाराने केल्याचं सांगितलं जात आहे.