X: @NalavadeAnant
मुंबई: देशभराच काय अगदी जगभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या प्रख्यात व्यंगचित्रकार म्हणून नावाजलेले बहुआयामी व्यक्तिमत्व हिंदुहृदसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे या नेत्यालाही केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी जाहीर मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार घोषित केला. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज एक्स या समाज माध्यमावर एक पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली. ज्यावेळी बाळासाहेबांना भारतरत्न घोषित होईल, त्याचा सर्वाधिक आनंद त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय, अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो आनंद द्विगणित करणारा क्षण असेल, असेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
आज घोषित झालेल्या भारतरत्न पुरस्कारांमध्ये डॉ. एस. स्वामिनाथन यांचे एक वर्षांपूर्वी निधन झाले. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला खरंतरं त्यांच्या हयातीतच हा बहुमान मिळायला हवा होता. पण असो, काही वर्षापूर्वी केंद्रातील भाजप सरकारने हे राजकीय औदार्य तरी दाखवलच आहे, असे म्हणावे लागेल. तसेच औदार्य त्यांनी आता हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनादेखील भारतरत्न घोषित करुन दाखवायलाच हवं, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
Also Read: सेलेब्रिटी विद्यार्थ्याना देणार १८ कलांचे ऑनलाईन शिक्षण : दीपक केसरकर