महाराष्ट्र ताज्या बातम्या

Battle within BJP : प्रकल्प मंजूर, पण पक्षांतर्गत अडथळेच जास्त; कांदिवलीत भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष

मुंबई: भाजपमध्ये स्थानिक गटबाजीचे वारे पुन्हा एकदा जोरात वाहू लागले आहेत. कांदिवली पूर्व परिसर भाजपसाठी मजबूत गड मानला जातो, मात्र स्थानिक नेतृत्वामधील अहंकार आणि श्रेयवादामुळे कामांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.

कांदिवली पूर्व येथील शहीद भगतसिंग उद्यानाच्या सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावावरून भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. भाजप पदाधिकारी देवांग दवे यांनी या उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिकेकडे प्रस्ताव दिला होता. त्याला भाजपचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीया यांच्या कोट्यातून निधीही मंजूर झाला होता.

मात्र, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी या कामाला आक्षेप घेत दवे यांच्या कामात खो घातला आहे. त्यांनी महापालिकेला पत्र पाठवून हे काम अनधिकृत असल्याचा दावा केला असून, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

देवांग दवे हे भाजपचे सक्रिय पदाधिकारी असून ते विविध सामाजिक उपक्रमांद्वारे परिसरात कार्यरत आहेत.

तर दुसरीकडे, आमदार प्रवीण दरेकर हे स्थानिक राजकारणातील वजनदार नेते असून त्यांचा स्वतःचा एक गट कार्यरत आहे.

या वादामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. या वादामुळे भाजपच्या स्थानिक संघटनात्मक एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षश्रेष्ठी याकडे कसे पाहतात आणि यातून पुढे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात