मुंबई
मराठा आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतर अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती. याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली आहे. येत्या २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल, अशी भावना याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली.
क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, 24 जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर सुनावणी होणार आहे. याचिता स्वीकारल्याने आशा निर्माण झाल्याचं पाटील पुढे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी 24 तारखेचा अल्टिमेटम सरकारला दिला होता. मुख्यमंत्र्यांनी मात्र सरसकट आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा शब्द दिलाय. त्यामुळे शनिवारी जरांगे पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. बीडमध्ये होत असलेल्या सभेत ते भूमिका जाहीर करतील.