बारामती
भाजपकडून शरद पवारांना बारामतीत घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा बदल केला आहे. भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा प्रभारी म्हणून नवनाथ पडळकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.
गेल्या 31 वर्षांपासून बारामती मतदारसंघ पवार कुटुंब जिंकत आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही सुरक्षित सीट मानली जाते. शरद पवार येथून 6 वेळा, सुप्रिया सुळे 3 वेळा आणि अजित पवार एक वेळा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.
बारामती मतदारसंघात ओबीसी मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यातही धनगर समाजाचे मतदान लक्षणीय आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीत भाजपने धनगर कार्ड काढलं आहे. 2019 मध्ये नवनाथ पडकरांनी वंचित बहुजन आघाडीतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. पडळकर यांनी बारामतीच्या प्रभारीपदी निवड केल्यामुळे भाजपने लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले, असं म्हणता येईल.
2014 आणी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे आजवर पाच लाखांहून अधिक मतदान झालं आहे. त्यात अजित पवारांचा राष्ट्रवाद गट भाजपसोबत आल्याने मोठ्या फरकाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हरवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.