ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोकणात भाजपाचे आमदार दुपटीने वाढण्याचा दावा

X : @MilindMane70

महाड – भारतीय जनता पक्षाचे (BJP) दक्षिण रायगडचे संयमित नेतृत्व व पक्ष वाढविण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणजे पक्षाने राज्यसभा खासदारकी देऊन धैर्यशील पाटील (Dhairyashil Patil) यांचा सन्मान केला आहे. पाटील यांना पक्षाने दिलेल्या या ताकदीमुळे यापुढील विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात भाजपाच्या सद्यस्थितीत असलेल्या आमदारांची संख्या दुपटीने होतील, असा दावा दक्षिण रायगड जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष जयवंत दळवी (Jaywant Dalvi) यांनी दिले आहेत.

दक्षिण रायगड जिल्हा भाजपा (BJP) अध्यक्ष धैर्यशील मोहन पाटील यांना भाजपाने राज्यसभेची (Rajya Sabha election) उमेदवारी देऊन त्यांचा जो सन्मान केला, त्यावरून भाजपा काम करणाऱ्यांना न्याय देते हे सिद्ध होत असल्याचे दळवी म्हणाले. पक्षात नवोदित तरुणांना काम करण्यास वाव आहे, नवोदित तरुणांच्या कार्याची दखल पक्ष योग्य वेळी घेत असते. धैर्यशील पाटील यांच्या रूपाने पक्षाने तरुणांना काम करण्याची मोठी संधी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत व त्यापूर्वी पक्ष वाढवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून धैर्यशील पाटलांना खासदारकी मिळाल्याचे उदाहरण असल्याचे जयवंत दळवी म्हणाले.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात विधानसभेचे १५ मतदारसंघ आहेत. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल व उरण या दोन मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचा एक आमदार आहे. येत्या विधानसभा भाजपच्या आमदारांची संख्या सध्याच्या तीन वरुण किमान दुप्पट होईल, असा दावा जयवंत दळवी यांनी केला.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात