महाराष्ट्र ताज्या बातम्या

BJP in Raigad: रायगड जिल्हा शंभर टक्के भाजपाचा होणार! : भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई – आगामी काळात रायगड जिल्हा भाजपाचा शंभर टक्के बालेकिल्ला होईल, असा ठाम विश्वास भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.

त्याचे कारण म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, दिवंगत आमदार मीनाक्षी पाटील यांचे बंधू, माजी आमदार पंडितशेठ ऊर्फ सुभाष पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, सवाई पाटील यांच्यासह भाजपात जाहीर प्रवेश केला.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, अविनाश कोळी, कमलाकर दळवी आणि माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.

“मोदी-फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने प्रवेश”
यावेळी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य वेगाने प्रगती करत आहेत. त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. पंडितशेठ पाटील हे सामान्य जनतेसाठी लढणारे नेते असून, त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होईल. भाजप त्यांच्या योगदानाचा सन्मान राखेल.”

“रायगडात भाजप क्रमांक एक होईल”
पक्षप्रवेशानंतर बोलताना माजी आमदार सुभाष पाटील म्हणाले, “पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्याचा सर्वांगीण विकास होणार असल्याची खात्री आहे. त्यामुळेच आम्ही भाजपात प्रवेश केला असून, रायगड जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी भाजपाच्या साथीने जोमाने कार्य करणार आहोत.”

शेकापच्या अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश
या पक्षप्रवेशात दिवंगत आमदार मीनाक्षी पाटील यांचे पुत्र व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच जिल्हा बँकेचे संचालक आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे ६ माजी सभापती, ७ जि.प. सदस्य, जिल्हा बँकेचे २ संचालक आणि ६० आजी-माजी सरपंचांनी भाजपात प्रवेश केला.

भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये जनार्दन पाटील, सुगंधा पाटील, संजय पाटील, प्रियदर्शिनी पाटील, भावना पाटील, संदीप घरत, एकनाथ गायकवाड, वैभव चांदे, वसंत यादव, राजा सानप, स्मिता पाटील, महादेव दिवेकर आदींचा समावेश आहे.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात