महाराष्ट्र ताज्या बातम्या

BJP MLA Parag Shah : घाटकोपर पूर्वात अनधिकृत फेरीवाले व वाहतूक कोंडीविरोधात जनआंदोलन

मुंबई :  घाटकोपर पूर्व येथील वल्लभबाग लेन आणि टिळक रोड परिसरात वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे तसेच सातत्याने होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले होते. या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंब केला.

घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांच्या नेतृत्वाखाली वल्लभबाग लेन आणि टिळक रोड परिसरात अनधिकृत फेरीवाले व वाहतूक कोंडीविरोधात भव्य जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारत तात्काळ व परिणामकारक कारवाईची मागणी केली.

अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या दोन्ही रस्त्यांवर रस्त्यांची रुंदी कमी झाली असून त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. यामुळे वाहनचालक, पादचारी, स्थानिक रहिवासी, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी हे जनआंदोलन उभारण्यात आले.

या आंदोलनात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच घाटकोपर पूर्व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याचा दबाव निर्माण करण्यात आला असून, लवकरच या परिसरातील अनधिकृत फेरीवाले हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात