महाराष्ट्र ताज्या बातम्या

नाशिक मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली गंभीर दखल

दोषींना ताबडतोब अटक करून कारवाई करण्याचे नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांना दिले निर्देश ठाणे: – नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे चार पत्रकारांना मारहाण झाल्या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधत पत्रकारांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. पत्रकारांना अमानुष […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात कुर्ला गायकरवाडीतील चौघे गंभीर जखमी

ग्रामीण रुग्णालयात रेबीज लसच नाही महाड : महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावकऱ्यांवर हल्ला चढवून चार जणांना गंभीर जखमी केले. मात्र, महाड ग्रामीण रुग्णालयात प्रतिबंधात्मक रेबीज लस उपलब्ध नसल्याने तिघा गंभीर जखमींना तब्बल ३० किलोमीटर दूर असलेल्या माणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवावे लागले. यामुळे महाड ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC elections :पालिका निवडणुका जवळ – कार्यकर्त्यांची फिल्डींग सुरू

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची धावपळ By सचिन व्ही. मुंबई : न्यायालयाने येत्या जानेवारीपर्यंत पालिका निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर ऐन सणासुदीच्या काळातच सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांची विभागवार फिल्डींग जोरात सुरू झाली आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांना फर्मान काढले आहे की, “वर्षानुवर्षे सोबत असलेल्या मंडळांना उत्सव साजरा करताना कुठेही कमी पडता कामा नये”. त्यामुळे विभागातील मंडळांची विचारपूस करणे, त्यांना आर्थिक मदत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Badlapur : बदलापूरमध्ये मलनि: सारण घोटाळा उघड: शेतकऱ्याच्या याचिकेतून उघडकीस आलेले प्रशासनाचे अपयश

मुंबई : बॉम्बे हायकोर्टात दाखल झालेल्या एका शेतकऱ्याच्या लढ्याने बदलापूरच्या नगरपालिकेचे धिंडवडे काढले आहेत. याचिका क्र. 7404/2024 मध्ये सोनवली (पश्चिम) येथील शेतकरी यशवंत अण्णा भोयर यांनी महाराष्ट्र शासन, कुळगाव -बदलापूर नगरपालिका(KBMC) आणि ए प्लस लाइफस्पेस या बांधकाम व्यावसायिकावर गंभीर आरोप केले आहेत. भोयर यांचे म्हणणे आहे की, त्रिशूल गोल्डन व्हिले या उंच इमारत प्रकल्पातून निघणारे […]

लेख

पुत्र व्हावा ऐसा…

By देवेंद्र भुजबळ आई-वडिलांची काळजी घेणे हे केवळ कौटुंबिक किंवा नैतिक कर्तव्य नाही, तर ती कायदेशीर जबाबदारी देखील आहे. मुलांकडून त्रास झाल्यास आई-वडील तक्रार करू शकतात आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा बातम्या वाचताना मन उदास होते. भारतातील एकत्र कुटुंबव्यवस्था कुठे हरवत चालली आहे, याची चिंता वाटते. तरीही काही ठिकाणी आशेचे किरण दिसतात आणि मन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Road Accident : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी संयुक्त बैठक

१५ दिवसांत उपाययोजना करण्याचे आश्वासन औरंगाबाद : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सतत होणारे अपघात थांबवण्यासाठी आज पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) पंकज अतुलकर, दौलताबाद पोलीस स्टेशनच्या निरीक्षक रेखा लोंढे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि माळीवाडा ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत अपघात रोखण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीतील ठळक निर्णय : महामार्गावरील खड्डे दोन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal on Sharad Pawar : पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून आंदोलन करवले – छगन भुजबळ

नागपूर: अंतरवली सराटी येथे २ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू होण्यासाठी शरद पवार गटातील आमदार कारणीभूत होते, असा थेट आरोप राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केला. नागपूरच्या रेशीमबाग चौकातील महात्मा फुले सभागृहात झालेल्या समता […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Eknath Shinde on Rahul Gandhi : राहुल गांधींचे आरोप निराधार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले मत चोरीचे आरोप संपूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट करत, “शंका असल्यास निवडणूक आयोगाकडे प्रतिद्यापत्र सादर करावे, पत्रकार परिषद घेऊन नुसते आरोप करणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राहुल गांधी यांनी मतदारांची नावे वगळून मतदारसंख्या कमी केल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Marathwada : मराठवाड्यात मुक्तीसंग्राम दिन साजरा, पण…

नांदेड : हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदाही वातावरण आनंदाचे असले, तरी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ओला दुष्काळाच्या संकटाने हा सोहळा विषण्ण पार्श्वभूमीवर पार पडला. गेल्या दोन दिवसांत जालना आणि बीड जिल्ह्यांत अतिवृष्टीने थैमान घातले. जालना जिल्ह्यातील सीता नदीला पूर येऊन पुलावर सहा फूट पाणी साचले. बीड जिल्ह्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis: सूक्ष्म, लघुउद्योगांसाठी जमीन अकृषक परवाना अट रद्द करण्याचे निर्देश

मुंबई : राज्यातील सूक्ष्म व लघुउद्योग तसेच अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी जमिनीच्या काही मर्यादेत अकृषक परवाना घेण्याची अट रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या धोरणात्मक सुधारणा बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर कार्यवाहीचे निर्देश देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या निर्णयामुळे उद्योजकांना परवाना प्रक्रियेत वेळेची बचत होईल आणि उद्योग लवकर सुरू करता येतील.” मुख्यमंत्री फडणवीस […]