महाराष्ट्र ताज्या बातम्या

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट जीआरविरोधात अभ्यासपूर्ण रिट याचिका दाखल; यश नक्कीच मिळणार – मंत्री छगन भुजबळ

नागपूर : हैदराबाद गॅझेटविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळल्याच्या बातम्या समोर येत असल्या तरी प्रत्यक्षात ती जनहित याचिका होती. न्यायालयाने रिट याचिका दाखल करण्यास सांगितले असून आपण अभ्यासपूर्वक रिट दाखल केली आहे. यात नक्कीच यश मिळेल, त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवू नये, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : “मनसेसोबत युतीचा निर्णय आम्ही घेऊ, तयारी मात्र प्रत्येक वॉर्डमध्ये हवी” – उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षातील गटप्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला – “मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये तुमची तयारी ठेवा. मनसेसोबत चर्चा सुरू आहे, मात्र युतीचा निर्णय आम्ही घेऊ. तयारी मात्र पूर्ण हवी. गरज पडली तर मदत त्यांनाही झाली पाहिजे.” मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला शंभर दिवस शिल्लक असताना उद्धव ठाकरे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर ससून डॉकला मिळणार आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाची जोड – मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मुंबई : मुंबईतील सर्वात जुने, व्यापारीदृष्ट्या आणि मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे ससून डॉक बंदर आता आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. बुधवारी मंत्रालयात फिनलंडमधील कंपन्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या भेटीत या संदर्भातील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधींवर सविस्तर चर्चा झाली, अशी घोषणा मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. राणे यांनी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

PM Modi : पंतप्रधान मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते – पियुष गोयल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, हे अनेक सर्वेक्षणांतून स्पष्ट झाले आहे. मात्र काही विरोधक सतत नकारात्मक विचार करत असल्याने त्यांना हे सत्य पचवणे कठीण जाते. अशा लोकांनीही आता सकारात्मक विचार करावा, अशी टिप्पणी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल (Minister Piyush Goyal) यांनी बुधवारी केली. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

AAP : महाराष्ट्रातही पंजाब सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या – आम आदमी पार्टीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सर्वत्र सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. विदर्भातील सोयाबीन पाण्याखाली गेले, कापूस अडचणीत आला आहे, संत्रा-मोसंबी गळती सुरू झाली आहे, तर कांदा पीक संपूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहे. पुण्यातील सुमारे ५५ महसूल मंडळांसह सोलापूर, बीड, भंडारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना सर्वात मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत तातडीने […]

ताज्या बातम्या मुंबई

Poet Bahinabai : बहिणाबाईंच्या हृदयाला भिडणाऱ्या कवितांनी मुंबईकर मंत्रमुग्ध

’अरे संसार संसार’ काव्य-गीतमय मैफलीला उस्फूर्त प्रतिसाद By श्रीकांत जाधव मुंबई : साध्या, सरळ आणि सर्वसामान्यांच्या भावविश्वाला भिडणाऱ्या बहिणाबाईंच्या कवितांनी मंगळवारी मुंबईकरांना मंत्रमुग्ध केले. “अरे संसार संसार” या अजरामर कवितेवर आधारलेल्या काव्य, संगीत आणि निवेदनाने सजलेल्या कार्यक्रमात रसिकांना अविस्मरणीय अनुभव लाभला. कवी ना.धों. महानोर यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर, भवरलाल-अँड-कांताबाई जैन फाउंडेशन आणि परिवर्तन यांच्या […]

ताज्या बातम्या अन्य बातम्या

१०२ देशांतील ७०० प्रतिनिधींच्या उपस्थितीत श्रीलंकेत तिसरा न्येलेनी ग्लोबल फोरम संपन्न

आमूलाग्र परिवर्तन – आज किंवा कधीच नाही” हे फोरमचे घोषवाक्य कॅंडी (श्रीलंका) : तिसरा न्येलेनी ग्लोबल फोरम ६ ते १३ सप्टेंबरदरम्यान श्रीलंकेतील कॅंडी येथे पार पडला. १०२ देशांतील ७०० हून अधिक प्रतिनिधी या जागतिक परिषदेत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, त्यापैकी ६० टक्के प्रतिनिधी महिला होत्या. शेतकरी संघटनांची जागतिक संस्था ला व्हिया कॅम्पेसिना ही या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Rabbi season : रब्बी हंगामासाठी महाराष्ट्राला तातडीने अतिरिक्त युरियाचा पुरवठा करावा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांना पत्र; राज्यातील युरिया साठा केवळ २.३६ लाख मेट्रिक टनावर मुंबई : “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात युरियाची कमतरता भासू नये यासाठी तातडीने अतिरिक्त पुरवठा करावा,” अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी केंद्र सरकारचे रसायन व खत मंत्री जे.पी. नड्डा यांना पत्राद्वारे केली. भरणे यांनी निदर्शनास आणून दिले की, राज्यातील युरियाचा […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

सणांच्या हंगामाआधी फ्लिपकार्ट मार्केटप्लेसमध्ये विक्रेत्यांची २५% वाढ

एआय-आधारित साधने, सुलभ ऑनबोर्डिंग आणि नव्या व्यापार केंद्रांमुळे विक्रीत मोठी वाढ बंगळुरू: देशातील अग्रगण्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने सणांच्या हंगामाआधी आपल्या विक्रेता परिसंस्थेत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. मागील सहा महिन्यांत विक्रेत्यांशी व्यवहारांमध्ये २५–३०% वाढ झाली असून, जून–ऑगस्ट २०२५ या तिमाहीत विक्रेत्यांच्या विक्रीत ३०% पर्यंत वाढ झाल्याचे फ्लिपकार्टने जाहीर केले. ही वाढ एआय-संचालित साधने, सुलभ विक्रेता उपाययोजना, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kisan Sabha Morcha : संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्यांचा विदर्भ दौरा सुरू

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी संवाद, कर्जमाफी व पीक विम्याच्या मागण्यांसाठी लढ्याचा संकल्प वर्धा : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे केंद्र असलेल्या विदर्भातील प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर केंद्रस्थानी आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्यांचा आजपासून विदर्भ दौरा सुरू झाला. महात्मा गांधींच्या सेवाग्राम (वर्धा) येथून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. हा दौरा तीन दिवसांचा असून पंजाब, हरियाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील […]