लेख

कापूस उत्पादकांच्या लुटीचे वास्तव

By Com Rajan Kshirsagar पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीबद्दल नेहमीच स्वतःची पाठ थोपटून घेतात. मात्र, जर केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाचे सूत्र लागू केले असते, तर प्रत्येक कापूस उत्पादक हा प्रधानमंत्री निधीतील सहा हजार परत देऊनही प्रति हेक्टर तब्बल २५ हजार रुपयांचे उत्पन्न कमवू शकला असता. अमेरिकेने २७ ऑगस्ट २०२५ पासून भारतीय कापड […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करून ओबीसींवरच गदा? – अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

मुंबई – राज्य सरकारच्या अलीकडील निर्णयावरून आरक्षणाच्या वादाला नवे वळण मिळाले आहे. नागपूर येथे सोमवारी माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “हैदराबाद गॅझेट” लागू करून कुणबी दाखले दिल्यास त्याचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

OBC Reservation: “काँग्रेसचा इतिहासच ओबीसींच्या विश्वासघाताचा” – भाजपाचा घणाघात

मुंबई – ओबीसी समाजासाठी आरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेसचा चेहरा उघड झाला असून, त्यांचा इतिहासच विश्वासघाताने बरबटलेला आहे, असा आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. “आज राहुल गांधी आणि विजय वडेट्टीवार यांसारखे नेते ओबीसींना भडकवण्याचे पाप करत आहेत. मात्र, खरा इतिहास सांगतो की ओबीसींचे नुकसान करणारी काँग्रेसच आहे,” असा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Renewable Energy: मुंबईत पत्रकारांसाठी राष्ट्रीय कार्यशाळा : नूतनीकरणीय ऊर्जा विषयावर माहितीची पर्वणी

मुंबई– मुंबई मराठी पत्रकार संघ आणि इंटरन्यूजच्या ‘अर्थ जर्नलिझम नेटवर्क’ (EJN) यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान नूतनीकरणीय ऊर्जेवरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी तामिळनाडू, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशातील पत्रकार व संवादकांना प्राधान्य दिले जाणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ सप्टेंबर २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत आहे. भारताने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : उध्दव सेनेचा निवडणूक शंखनाद – बंद दाराआड रणनीतीने विरोधकांमध्ये खळब

मुंबई– मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. सत्ता समीकरणं, आगामी निवडणुकीच्या हालचाली आणि पक्षातील आतल्या गोटातील चर्चांनी वातावरण तापवलं आहे. यामध्येच उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अचानक मुंबईतील विभागप्रमुखांना मातोश्रीवर बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्व मोठ्या पक्षांत चर्चा सुरू आहेत. कोण कुणासोबत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या आत्महत्या तातडीने थांबवा – किशोर तिवारी

कामाआधीच घेतलेले ३० टक्के कमिशन परत करण्याचे नेत्यांना आवाहन यवतमाळ: राज्यातील हजारो कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके प्रलंबित असून, पैसे न मिळाल्याने अनेक कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत. याच आर्थिक ओढाताणीतून अनेक कंत्राटदार आत्महत्या करीत आहेत. ही मालिका थांबवण्यासाठी आणि निरपराध लहान कंत्राटदारांचे प्राण वाचवण्यासाठी तातडीची पावले उचलावीत, असे आवाहन शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Dhule : गणपती मूर्ती विसर्जनाचा धिवरे पॅटर्न

धुळे – धुळे शहरात यंदाच्या गणेश विसर्जनात आवाजाची भिंत (डीजे) आणि लेझर लाइटिंग या प्रतिबंधित घटकांशिवाय झालेली मिरवणूक राज्यभरात आदर्श ठरली. मात्र विसर्जनानंतर उघड्यावर पडलेल्या गणेश मूर्तींच्या सुरक्षित विसर्जनाचा नवा प्रयोग – “मूर्ती विसर्जनाचा धिवरे पॅटर्न” – आता चर्चेत आहे. धुळे शहर संवेदनशील असल्याने येथे पोलीस प्रशासनाला नेहमीच विशेष दक्षता घ्यावी लागते. यंदा जिल्हा पोलीस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांची सोमवारी दिल्लीमध्ये महत्वपूर्ण बैठक

रविवारी रात्रीच खासदारांना दिले दिल्लीत हजर राहण्याचे आदेश नवी दिल्ली – महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार म्हणून उभे आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक सोमवारी (८ सप्टेंबर) दुपारी १२.३० वाजता दिल्ली येथे बोलावण्यात आली आहे. ही बैठक शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या राष्ट्रीय

जेएनयूच्या कुलगुरुंबद्दल महाराष्ट्राची संतापजनक नाराजी – ९ कोटींचा निधी गेला कुठे

नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्र शासनाने तब्बल ९ कोटी रुपयांचा निधी देऊनही जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आजही फक्त कागदावरच आहे. एकही वीट न रचली जाणे, कोणतेही बांधकाम न सुरू होणे, हा प्रकार महाराष्ट्राच्या अस्मितेवर पाणी फेरणारा ठरत असून कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांच्याबद्दल संतापाचा सूर चढू लागला आहे. डॉ. […]

लेख

द बंगाल फाइल्स: जिनकी लाशों पर पग धर कर …

By महेश काळे ‘ द बंगाल फाइल्स’ पाहायचा असेल तर मन खरोखरीच घट्ट करून बघावा लागेल. भारताच्या इतिहासात वास्तविक घडलेल्या घटनांवर असा एखादा सिनेमा बनवणे हे तसे हिंमतीचे काम. अशी हिम्मत विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशीने दाखवली आहे. मात्र हे सर्व पडद्यावर बघणे हे देखील खूप मोठ्या हिमतीचे काम आहे. स्वातंत्र्यापूर्वी एक वर्ष अगोदर म्हणजे […]