Bogus Doctor Case : बोगस डॉक्टर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तीव्र भूमिका – दोषींवर गुन्हा दाखल न झाल्यास आरोग्य विभागाला घेराव
मुंबई : सांताक्रूझ येथील बी.एन. देसाई रुग्णालयासह मुंबईतील काही रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात बोगस डॉक्टर नेमण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ करणाऱ्या या गंभीर गैरप्रकाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र भूमिका घेतली आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी बृहन्मुंबई महापालिका आयुक्त (आरोग्य विभाग) […]