महाराष्ट्र ताज्या बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाचा अभ्यास सुरू, आंदोलन व उपोषणे तात्पुरती थांबवावीत – छगन भुजबळ

मुंबई: मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयात काही वाक्ये आणि शब्दांबद्दल संभ्रम आहे. याबाबत आम्ही ज्येष्ठ विधीज्ञांशी सविस्तर चर्चा करत आहोत. गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ओबीसी समाजाने आंदोलने (Protest by OBC) व उपोषणे तूर्त स्थगित करावीत, असे आवाहन राज्याचे मंत्री व अखिल भारतीय महात्मा फुले समता […]

लेख

डॉक्टर–रुग्ण नातं : व्यवहार की सेवा?

By: संदीप यशवंत मोने, पेण भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात १९९५ मध्ये झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने या पवित्र नात्याचे स्वरूपच बदलून टाकले. इंडियन मेडिकल असोसिएशन विरुद्ध व्ही.पी. शांथा प्रकरणात वैद्यकीय सेवांना ग्राहक संरक्षण कायद्याखाली आणले गेले, आणि त्या दिवसापासून डॉक्टर हा केवळ “सेवा पुरवणारा” आणि रुग्ण हा “ग्राहक” ठरला. जवळपास तीन दशकांनी आपण या निर्णयाची फळे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Maratha Reservation : मराठा समाजाचा विजय : सरकारचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. “हैदराबाद गॅझेट लागू करून त्याचे लाभ मराठा समाजाला मिळवून देणार आहोत. सरकारने काढलेला अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर टिकणारच,” असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे म्हणाले, “मराठा समाजाला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : राज्य सरकारच्या जीआरवर कायदेशीर प्रश्नचिन्ह : संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन

मुंबई: राज्य सरकारने जारी केलेल्या शासकीय निर्णयावर (जीआर) कायदेविशारदांनी तीव्र आक्षेप घेतले असून तो संविधानातील मूलभूत अधिकारांशी विसंगत असल्याचा आरोप केला आहे. ॲड. अमोल मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात या जीआरविरोधात ठोस कायदेशीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, संबंधित जीआरमध्ये भारताच्या संविधानातील कलम 14 (समानतेचा हक्क) आणि कलम 21 (जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरक्षण संकटावर फडणवीसांचा पडद्यामागील निर्णायक रोल

मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उभा राहिलेला तणाव यशस्वीरीत्या सोडवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली. आंदोलनाच्या काळात वैयक्तिक हल्ले आणि टीका सहन करतानाही संयम राखत त्यांनी सातत्याने कायदेशीर सल्लामसलत करून उपाययोजना पुढे नेल्या. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या चार बैठका घेतल्या. मागण्यांच्या अनुषंगाने मसुदा तयार करून प्रत्येक निर्णयाचा शासकीय आदेश […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एसटीच्या “सोन्याच्या जमिनींवर”… सरकारची “वक्रदृष्टी”?

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुका होऊन भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील यंत्रणा मोठ्या उद्योगपतींना मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणच्या जमिनी कवडीमोल दराने देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. धारावी पुनर्विकासासोबतच कुर्ला आरे डेअरीची जमीन, मानखुर्दचे डंपिंग ग्राउंड अंबानी समूहाला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कशी येणार महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक?

कसले बघता महाशक्तीचे स्वप्न? मुंबई, देशाची आर्थिक राजधानी, जिथे अनेक देशांचे कॉन्सुलेट कार्यालय आहेत, विदेशी राजदूत इथून कारभार पाहतात आणि महाराष्ट्र व देशातील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून गुंतवणूक आणि द्विपक्षीय संबंधांचे निर्णय घेतात—ती आर्थिक राजधानी मराठा आंदोलकांनी अक्षरशः वेठीस धरली आहे. मुंबईने गेल्या शंभर–दीडशे वर्षांत अनेक आंदोलने अनुभवली आहेत. अगदी ब्रिटिश शासनकाळातली आणि स्वातंत्र्यानंतरची अनेक […]

लेख

मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यात मागच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील 130 मंडळात येणार्‍या जवळपास 2550 गावांना या अतिवृष्टीचा फटका बसला. वार्षिक सरासरी 679 मि.मी.च्या तुलनेत विभागात 573 मि. मी. म्हणजेच 84% पाऊस झाल्याची नोंद आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांची पूर्ण नासाडी झाली. एवढेच नव्हे तर शहरी भागात असलेल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Maratha Reservation : “मराठा आरक्षणाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फडणवीस जी, ७ दिवसात आरक्षण देण्याचं काय झालं?” – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: “मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते, आणि ती भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. सत्ता दिल्यास ७ दिवसात आरक्षण देतो अशी घोषणा त्यांनी केली होती, पण आजपर्यंत काहीच झालेले नाही,” असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. सपकाळ म्हणाले, “मराठा समाजाला दिलेलं आरक्षण फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात इम्पिरिकल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Tariff war : टेरीफ वॉरच्या पार्श्वभूमीवरही महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक – ३४ हजार कोटींचे करार, ३३ हजार रोजगार

मुंबई: देशात “टेरीफ वॉर” सुरू असतानाही गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात तब्बल ₹३३,७६८ कोटी ८९ लाखांची नवी गुंतवणूक झाली असून, यातून ३३,४८३ रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. फडणवीस म्हणाले, “देशभरातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राला एवढ्या प्रमाणात गुंतवणूक […]