महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठी शाळा बंद, शिक्षक आंदोलनात; मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे – खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

मुंबई – राज्यातील ५ हजारांहून अधिक शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत आणि अनेक मराठी शाळा बंद आहेत, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली. सुळे म्हणाल्या की, १० ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांनी ५००० विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची घोषणा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

”मुंबई सर्व प्रांतातील लोकांचे शहर; मराठी अस्मितेप्रती काँग्रेस कटिबद्ध” – रमेश चेन्नीथला

मुंबई/दिल्ली – मुंबई ही केवळ मराठी माणसांचीच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांचीही आहे. येथे कोणताही भाषिक किंवा प्रांतीय वाद नाही, मात्र काँग्रेस मराठी अस्मितेसोबत खंबीरपणे उभी आहे, असे स्पष्ट मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केले. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या मराठी विरोधी वक्तव्याचा निषेध केला. राज ठाकरे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जनसुरक्षा कायदा म्हणजे नव्या स्वरूपातला रौलेट कायदा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

मुंबई/दिल्ली – महाराष्ट्रात भाजप युती सरकारकडून आणला जात असलेला जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू असून, ब्रिटिशांनी १९१९ मध्ये आणलेल्या रौलेट कायद्याचेच हे नवस्वरूप आहे, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा कायदा फडणवीस सरकारचा लोकशाही विरोधी डाव असल्याचे ठामपणे सांगितले. “शहरी नक्षलवाद” हे फक्त […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

”नशा खुबे”च्या वक्तव्याविरोधात ‘जोडे मारो आंदोलन’; घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जोरदार एल्गार

घाटकोपर, मुंबई – मराठी अस्मितेचा अपमान करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे उर्फ “नशा खुबे” यांच्याविरोधात घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे जोरदार “जोडे मारो आंदोलन” छेडण्यात आले. मराठी भाषेवर केलेल्या टीकेविरोधात आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्या वक्तव्यामुळे या खासदाराला चपलेचा ‘सन्मान’ देण्यात आला. घाटकोपर पश्चिमेतील वेलकम हॉटेल परिसरात पार पडलेल्या या आंदोलनाचं नेतृत्व […]

मुंबई

मीरा-भाईंदर मोर्चा प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा सरकारवर घणाघाती ह

मुंबई – मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या अन्यायाविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चास परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत मंगळवारी बोलताना ठाकरे गटाचे उपनेते व माजी मंत्री सचिन अहिर यांनी महायुती सरकारवर आणि पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेवर जोरदार टीका केली. “हे सरकार महायुतीचे आहे की ब्रिटीश राजवटीचे?” असा सवाल करत अहिर म्हणाले, “एकीकडे मोर्चास परवानगी द्यायची, आणि दुसरीकडे ती परत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या निदर्शनास

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या अद्याप न झालेल्या नियुक्तीबाबत गंभीर चिंता व्यक्त करत विरोधी पक्षाच्या वतीने एक निवेदन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ही घटनात्मक पदाची पायमल्ली असून लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणारी बाब आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल २३ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Hutatma Smarak :महाडचे हुतात्मा स्मारक दारुड्यांचा अड्डा, पार्किंग झोन बनले; नगरपालिकेचे दृष्टीआड दुर्लक्ष

महाड – महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले हुतात्मा स्मारक आज दारू पिणारे, बेवारस लोक आणि बेशिस्त पार्किंगचा अड्डा बनले आहे. सायंकाळच्या वेळी दारुड्यांनी स्मारकाच्या भिंतीला टेकून दारू प्यायची सवय लावली असून, सहा आसनी रिक्षा, मोटरसायकली आणि नगरपालिका कचरा हातगाड्यांनी परिसर वेढलेला असतो. नगरपालिकेच्या मुख्यालयालगत असलेल्या या स्मारकाची दयनीय अवस्था पाहून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नाशिक मनपातील कंत्राटी कामगारांचे वेतन लंपास प्रकरण; दोषींवर फौजदारी कारवाई होणार – मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – नाशिक महानगरपालिकेच्या विविध सेवांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या वेतनातून अवैधरित्या रक्कम कापणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. तसेच संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि दोन महिन्यांत कामगारांच्या हितासाठी ठोस धोरण जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. भाजपच्या आमदार देवयानी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एसटी भांडार खरेदी गैरव्यवहारात २२ जण दोषी; १५ जणांवर निलंबनाची कारवाई होणार – परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती

मुंबई – पुण्यातील दापोडी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या विशेष लेखापरीक्षणात २२ अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले आहेत. यापैकी १५ कर्मचारी अद्याप सेवेत असून उर्वरित सात जण सेवानिवृत्त झाले आहेत. दोषी ठरलेल्या १५ कर्मचाऱ्यांवर मासिक वेतनाच्या १० टक्के कपात करण्यात आली असून त्यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सामाजिक-आर्थिक समानतेसाठी राज्यघटना केंद्रस्थानी ठेवून काम करा — सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन

मुंबई – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक-आर्थिक समानतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी गेली बावीस वर्षे न्यायदेवतेची सेवा करण्याचा खारीचा वाटा उचलता आला, याचे मला समाधान आहे; सरन्यायाधीश पदही मी सेवाच समजतो,” अशी भावना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील सत्कार समारंभात व्यक्त केली. सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल विधानमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]