महाराष्ट्र ताज्या बातम्या

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय: मुख्यमंत्री

मुंबई: त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक आज रात्री पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदीची सक्ती नाही, केवळ मराठीच बंधनकारक; राज्यातील चर्चा अवास्तव आणि दिशाभूल करणाऱ्या – आशिष शेलार यांची परखड भूमिका

मुंबई – “राज्यात केवळ मराठी भाषा बंधनकारक असून हिंदीची सक्ती कुठेही करण्यात आलेली नाही, उलट ती ऐच्छिक तिसऱ्या भाषेचा पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे,” अशी परखड स्पष्टोक्ती मुंबई भाजपा अध्यक्ष व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. “फक्त चर्चा घडवण्यासाठी, समाजात संभ्रम पसरवण्यासाठी आणि राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी काही […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“आप” मध्ये दम आहे! : मुकुंद किर्दत

दुप्पट मताधिक्याने मिळवलेला पोटनिवडणुकीतील विजय म्हणजे देशभरातील आम आदमी पार्टीच्या पुनरागमनाची चाहूल! पुणे – देशभरात आज पार पडलेल्या पाच पोटनिवडणुकांच्या निकालांमध्ये आम आदमी पार्टीने लक्षवेधी कामगिरी करत दोन महत्त्वाच्या मतदारसंघांत विजय मिळवला आहे. गुजरातमधील विसावदर (जि. जुनागड) येथून गोपाल इटालिया यांनी १७,५८१ मताधिक्याने, तर पंजाबमधील लुधियाना येथून संजीव अरोरा यांनी १०,५४८ मतांनी विजय मिळवला आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना आवश्यक” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी

मुंबई — मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) खेळातील एका महिला खेळाडूने क्रीडा महासंघाच्या अध्यक्षावर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला तातडीने ठोस, रचनात्मक आणि परिणामकारक उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने १८ जून २०२५ रोजी पीडित खेळाडूचा जबाब नोंदवण्याचे निर्देश […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच परिवहन मंत्र्यांनी सादर केली एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका!

मुंबई – मंत्रालयीन परंपरेला फाटा देत आणि विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणत, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी इतिहासात पहिल्यांदाच एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. सामान्यतः मंत्र्यांकडून अशी श्वेतपत्रिका प्रकाशित केली जात नाही, कारण ती संबंधित खात्याची नामुष्की मानली जाते. मात्र, मंत्री सरनाईक यांनी ही राजकीय आणि प्रशासकीय संकोचाची भिंत तोडत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

येणाऱ्या चार वर्षांत एसटी महामंडळाला फायद्यात आणणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आगामी चार वर्षांत फायद्यात आणण्याचा निर्धार परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. ते एसटी महामंडळाच्या आर्थिक श्वेतपत्रिकेचे प्रकाशन करताना बोलत होते. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raigad : धोकेदायक आंबेत आणि टोळ पुलाचे भवितव्य अंधारात!

नव्या पुलाच्या उभारणीसाठी निधीचा घोळ, लोकप्रतिनिधींची उदासीनता महाड – कोकणचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. बॅ. ए. आर. अंतुले यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेले आंबेत आणि टोळ पूल आज धोकादायक परिस्थितीत असून त्यांचे भवितव्य अंधारात आहेत. कालबाह्य झालेल्या या पुलांची नव्याने उभारणी आवश्यक असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे केवळ तात्पुरत्या दुरुस्तीवरच कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कर्जमाफीबाबत योग्य वेळ आणि पारदर्शकतेवर सचिन सावंत यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल

मुंबई — शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप सरकारची भूमिका संदिग्ध असल्याचा आरोप करत सावंत यांनी सरकारच्या निवडणूक घोषणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सावंत म्हणाले, “मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीसाठी योग्य आणि उचित वेळ नेमकी कोणती, हे स्पष्टपणे सांगावे. त्याचबरोबर कर्जमाफी करताना कोणते नियम […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजणार!

२०० आमदारांचा सरकारवर एकमुखी दबाव; सत्ताधारी पक्षांमध्ये श्रेयासाठी स्पर्धा मुंबई – राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाचा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रस्थानी असणार आहे. विधानसभेतील २८८ सदस्यांपैकी तब्बल २०० आमदार कर्जमाफीच्या मुद्यावर आक्रमकपणे आवाज उठवण्यासाठी सज्ज झाले असून, तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना आणि स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. राज्य विधिमंडळाचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kashmir : असुरक्षिततेची भावना दूर होऊन परिस्थिती सामान्य : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

सोनमर्ग (जम्मू आणि काश्मीर) – ऑपरेशन विजयच्या २६व्या विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारगिल दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सोनमर्ग येथे ताफा थांबवून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. कारगिलच्या द्रासमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉन २०२५ या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी जात असताना, श्रीनगरहून द्रासकडे प्रवास करताना त्यांनी वाटेत उतरून काश्मीरमधील सद्यःस्थितीची माहिती घेतली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी […]