महाराष्ट्र ताज्या बातम्या

देशभरात २ लाख नव्या पॅक्स; सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला चालना

मुंबई : “सहकार ही भारताच्या जीवनशैलीचा आत्मा आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत केले. हॉटेल फेअरमोंट येथे आयोजित ‘सहकार से समृद्धि’ राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे

By देवेंद्र भुजबळ अमेरिकेत गेली ४० वर्षे कर्करोगावर संशोधन करणाऱ्या आणि विविध माध्यमांद्वारे कर्करोगाविषयी जनजागृती करीत असलेल्या डॉ सुलोचना गवांदे यांची प्रेरणादायी जीवन कहाणी… कर्करोगाचे आपल्यालामागच्या दशकात प्रामुख्याने चार पाच प्रकारच माहिती होते. पण आता समजतेय की ही संख्या १०० च्या वर आहे. कर्करोग आणि इतर आजार यातील मूळ फरक म्हणजे बहुतांश इतर रोग हे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदी सक्तीच्या वादामागे फडणवीस-राज ठाकरे यांची मिलीभगत – नाना पटोले यांचा आरोप

”मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतरच वादग्रस्त जीआर कसा काढला?” मुंबई: राज्यातील ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचा मुद्दा जाणीवपूर्वक उकरून काढला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतरच राज्य सरकारने हिंदी सक्तीबाबतचा वादग्रस्त […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाडमध्ये मुसळधार पावसाने पूरजन्य परिस्थितीचा धोका; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

गेल्या दोन दिवसांपासून संततधार; सावित्रीसह अन्य नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या महाड : मे महिन्यातच सुरू झालेला मान्सून आता पूर्ण ताकदीने कोसळू लागला असून, गेल्या दोन दिवसांपासून महाड शहर व परिसरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील सावित्री, गांधारी आणि काळ या नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या असून, त्यामुळे पूरजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रयोगात्मक कलांसाठी शाहीर साबळे संशोधन केंद्राची स्थापना – ॲड. आशिष शेलार यांची घोष

मुंबई : महाराष्ट्रातील समृद्ध प्रयोगात्मक कलांचा सखोल अभ्यास आणि संशोधन करता यावे, यासाठी पु.ल. देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राला पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत केली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

खर्डी–नेवाळी रस्ता वर्षभरातच बंद; रायगड प्राधिकरणाचा हलगर्जी कारभार उजेडात

किल्ले रायगड : पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खर्डी–नेवाळी–हिरकणीवाडी रस्त्याचे काम झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच रस्ता वाहून गेला आहे. रायगड प्राधिकरणाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिकांच्या सूचना दुर्लक्षित करून ठेकेदाराच्या हितासाठी रस्ता आखल्याचा आरोप होत असून, यामुळे कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाड–रायगड २४ किमी रस्त्याव्यतिरिक्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खर्डी गाव ते नेवाळी–हिरकणीवाडी मार्ग तयार करण्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इस्रायल-इराण संघर्षाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर संभाव्य फटका!

प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारला तातडीच्या धोरणात्मक निर्णयांचे आवाहन मुंबई : इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेकडे लक्ष वेधत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांची गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्र सरकारला तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. आंबेडकर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (Twitter) हँडलवरून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

फाल्कन 2000 जेटसची नागपुरात निर्मिती; डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कराराचे स्वागत मुंबई: पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात फाल्कन 2000 जेटसच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला असून, फ्रान्सच्या बाहेर अशाप्रकारची प्रथमच ही निर्मिती होणार आहे. ही निर्मिती नागपुरात होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून या कराराचे स्वागत केले आहे. नागपूर, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हाउसिंग जिहाद’च्या माध्यमातून मुंबईचा सामाजिक समतोल बिघडवण्याचे षड्यंत्र – शिवसेना उपनेते संजय निरुपम

मुंबई : जोगेश्वरीतील दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये चांदिवाला एंटरप्रायझेस या विकासकाकडून सुमारे ₹६६० कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला आहे. यामध्ये २२० अनधिकृत फ्लॅट्स उभारण्यात आले असून, हे फ्लॅट्स मुस्लिम समुदायातील नागरिकांना विकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम म्हणाले की, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला खास व्यंगचित्र प्रसिद्ध

हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी” म्हणत ठाकरे गटावर शरसंधान मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गुरुवार, १९ जून रोजी वरळीतील एनएससीआय डोम येथे आपला वर्धापन दिन साजरा करणार आहे. या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला शिंदे गटाने आपल्या राजकीय दिशा व भूमिकेचा संकेत देणारे एक व्यंगचित्र समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध केले असून, “हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र […]