महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्यातील २७ मंडळांमध्ये मे महिन्यात अतिवृष्टी

मे महिन्यात दरवर्षी कडक उन्हाळा जाणवतो, परंतु यंदा मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात धुवाधार पाऊस पडत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील ८, जालना व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी ५ मंडळात अतिवृष्टीचा कहर झाला आहे. एकूण २७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद असून, नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या आठवड्यापासून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

परमवीर सूबेदार जोगिंदर सिंह मार्गाचा नामफलक पुन्हा बसवला: अनिल गलगलींच्या पाठपुराव्याला यश

मुंबई: अंधेरी (पूर्व) येथील चिमटपाडा परिसरात Inconica हॉटेलपासून अंधेरी-कुर्ला मार्गापर्यंतच्या रस्त्याचे नामकरण परमवीर चक्र विजेते सूबेदार जोगिंदर सिंह मार्ग असे करण्यात आले होते. मुंबई महापालिकेने या मार्गावर नामफलकही बसवला होता. मात्र, सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान तो हटवण्यात आला आणि दीर्घकाळ नव्याने लावण्यात आला नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी के/पूर्व विभागाचे सहायक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : हुंडा छळ, राजकीय प्रतिष्ठा आणि पोलिसांच्या निष्क्रीयतेविरोधात ‘आप’ महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

पुणे : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आज ‘आम आदमी पार्टी’च्या महिला आघाडीतर्फे गुडलक चौकातील कलाकार कट्ट्याजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. “हुंड्याला राजकीय प्रतिष्ठा नको, हुंडा छळा विरोधात कठोर कारवाई करा, वैष्णवीला न्याय मिळवा” या मुख्य मागण्यांसह आंदोलनकर्त्यांनी दोषींवर तात्काळ कडक कारवाईची मागणी केली. पुणे शहर महिला अध्यक्ष सुरेखा भोसले यांनी म्हटले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आत्महत्या ही दु:खदच… पण राज्य सरकारकडून शेतकरी कुटुंबांसाठी २० कोटींचा विशेष मदतनिधी

मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने २० कोटी रुपयांचा विशेष मदतनिधी मंजूर केला आहे. हा निधी विभागीय आयुक्तांमार्फत थेट जिल्हाधिकाऱ्यांना वितरित केला जाणार असून, गरजू कुटुंबांना वेळेवर मदत मिळाल्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. राज्यात नापिकी, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

टीका-आरोपांना कामातून उत्तर दिल्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो : शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी हाती घेतला धनुष्यबाण मुंबई : विरोधकांच्या आरोपांना आणि टीकेला आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिले, त्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे तसेच मुंबईतील उबाठा नगरसेविका सुजाता सानप यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“दालनात कुणाचे फोटो असणार?” – छगन भुजबळ यांचा अधिकाऱ्यांना सवाल, पत्रकारांशी दिलखुलास गप्पा

मुंबई : गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे शुक्रवारी पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते सोपवण्यात आले. याचबरोबर मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरचं, पूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडे असलेलं दालनही त्यांच्याकडे देण्यात आलं. आज त्याच दालनात पहिल्यांदाच दाखल झालेल्या भुजबळ यांना माध्यमांनी तिथेच गाठलं. कायम दिलखुलास आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगड पायरीमार्ग २८-२९ मे बंद

शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर ६ जून (तारखेप्रमाणे) आणि ९ जून (तिथीनुसार) होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. २८ आणि २९ मे रोजी रायगड किल्ल्यावर जाणारा पारंपरिक पायरीमार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी २२ मे रोजी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

गडचिरोलीत नक्षलविरोधी कारवाईत 4 ठार, शिंदेंकडून अभिनंदन

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात गुरुवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या यशस्वी कारवाईनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महासंचालक (डीआयजी) संदीप पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. शिंदे यांनी सांगितले की, “देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या लढ्याला […]

लेख ताज्या बातम्या

अशोक मुळ्ये काका : एक जबरदस्त भन्नाट अवलिया!

By: योगेश वसंत त्रिवेदी “नमस्कार! या बरं झालं तुम्ही आलात. मी फक्त कळवलं. मला मेसेज पाठवता येत नाही. ते काम कल्पना आणि शेखर करताहेत. महेशही करतोय मदत. बरं, खाली चहाची व्यवस्था केली आहे. चहा प्यायलात कां? जा पहिल्यांदा चहा घेऊन या. ही खारी घ्या. गिरगावातली आहे. साखर पण आहे त्यात. हां, शुगर फ्री शुगर. ३ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या उपनिबंधकाच्या चौकशीचे आदेश – माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पाठपुराव्याला यश

7 दिवसांत चौकशी अहवाल सादर करा — महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश कल्याण : मागाठाणे 17 येथील उपनिबंधक अधिकारी संजय साळवे यांनी स्थानिक विकासकांच्या फायद्यासाठी संगनमताने मुद्रांक शुल्कात घोटाळा करून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा गंभीर आरोप भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी […]