तंजावरकरांना मूळ गावांची ओळख व्हावी; महाराष्ट्र-तंजावर मनोमिलन व्हावे – बाबाजीराजे भोसले यांची भावना
मुंबई : “महाराष्ट्र आणि तंजावरच्या रहिवाशांमध्ये भेटीगाठी घडून मनोमिलन व्हावे, आणि त्यातून तंजावरमध्ये राहणाऱ्या सुमारे तीन लाख मराठी भाषिकांना त्यांच्या मूळ गावांची, कुळांची ओळख पटावी,” अशी भावना तंजावरचे सध्याचे महाराज बाबाजीराजे भोसले यांनी आज येथे व्यक्त केली. महाराज भोसले यांनी मंत्रालय व विधिमंडळातील वार्ताहर कक्षाला भेट दिली. यावेळी अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी त्यांचे स्वागत केले. […]