Open University: कथा, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याचा मुक्त विद्यापीठाकडून गौरव
नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहिशाल केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सन 2023 मधील विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीत पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री चैत्राम पवार होते, तर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, प्रा. संजिवनी महाले आणि विद्यार्थी कल्याण […]