महाड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत मुंबईतील लालबाग येथील राजे फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करून शिवरायांना अनोखे अभिवादन केले.
राजे फाउंडेशन वर्षभर सामाजिक उपक्रम राबवत असते. त्याच परंपरेत, शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अक्षय ब्लड सेंटरच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात तब्बल १४४ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धांत अशोक पिसाळ, संस्थापक-अध्यक्ष रोहित अशोक पिसाळ, संस्थापक सचिव पंकज सूर्यकांत कोल्हे, खजिनदार योषित श्रीधर नागावकर, उपाध्यक्ष मयुरेश दिलीप पाटील, संतोष मारुती पवार, सहसचिव ऋषिकेश आचारी, उपखजिनदार मयुरेश अनंत पाटील, सोशल मीडिया प्रमुख प्रदीप कस्तुरे, तसेच कार्यकारिणी सदस्य विशाल साळुंखे, रवींद्र साडेकर, उन्मेष ठाकूर आणि मनोज पोळ यांनी विशेष मेहनत घेतली.
रक्तदात्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना राजे फाउंडेशनतर्फे भेटवस्तू म्हणून डिजिटल स्मार्ट वॉच, ब्लूटूथ इयरपॉड्स, अमेरिकन टूरिस्टर बॅग, मिल्टनचा पाण्याचा जार, आणि मिल्टन टिफिन सेट देण्यात आले.
हा उपक्रम सामाजिक भान आणि शिवप्रेम यांचे उत्तम उदाहरण ठरला.