महाराष्ट्र ताज्या बातम्या

Cabinet Decision: राज्याच्या पोलीस दलात १५ हजार पदांची ‘महाभरती’ — मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्याच्या पोलीस दलात तब्बल १५ हजार पदांची भरती होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील तरुणांसाठी ही संधी ‘सुवर्णसंधी’ ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

या भरतीत पोलीस शिपाई १०,९०८ पदे, चालक २३४, बॅण्डस् मॅन २५, सशस्त्री शिपाई २,३९३ आणि कारागृह शिपाई ५५४ अशी पदे भरली जाणार आहेत. एवढेच नव्हे, तर २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही विशेष संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी लेखी परीक्षा ‘ओएमआर’ प्रणालीद्वारे घेण्यात येणार असून, सर्व टप्प्यांचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे असतील.

उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार, पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे. आता राज्यातील हजारो तरुणांची नजर भरती जाहिरातीच्या अधिकृत घोषणेवर खिळली आहे, कारण पुढचा टप्पा त्यांचे भवितव्य ठरवणार आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात