ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महेश गायकवाडांची प्रकृती गंभीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल

मुंबई

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या शरीरातील सहा गोळ्या बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

गायकवाड यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात पोहोचले आहेत. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतून बचावलेल्या महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं पत्र रुग्णालय प्रशासनाने काढले आहे. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात