महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : शालेय स्पर्धेदरम्यान नववीतील विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

महाड: कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी अलिबाग येथून आलेल्या नववीतील विद्यार्थिनीचा कार्यक्रमादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी महाड येथे घडली. या घटनेमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मृत विद्यार्थिनीचे नाव निधी समीर म्हात्रे असे असून ती कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील शाळेत नववीत शिक्षण घेत होती. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विविध आंतरशालेय स्पर्धा यावर्षी महाड येथील चांदे क्रीडांगणावर १२ व १३ डिसेंबर या दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांसाठी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी महाड येथे दाखल झाले होते. निधी म्हात्रे ही विद्यार्थिनी वक्तृत्व स्पर्धेसाठी शहाबाज हायस्कूलकडून सहभागी झाली होती. आज दुपारपासून पारितोषिक वितरण समारंभ सुरू असताना, बक्षीस स्वीकारून परत येत असताना तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली.

तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृत्यूचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. निधीच्या पालकांच्या महाड येथे आगमनानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

निधी म्हात्रे यांच्या आकस्मिक निधनामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये तीव्र शोककळा पसरली असून पारितोषिक वितरण समारंभावरही दुःखाचे सावट पसरले होते.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात