X : @therajkaran
पुणे – मुंबई पुण्यातील उंच इमारतींमधील बंद लोखंडी दरवाज्यांच्या उदवाहन (Lift) मध्ये लहान वा तरुण मुलींसोबत शारीरिक गैरवर्तनाचे (sexual abuse on women) प्रकार वाढत चाललेले आहेत. विशेष करून ‘स्टॅन्ड अलोन’ म्हणजे अनेक इमारतींच्या सोसायट्यांऐवजी एकच इमारत असलेल्या सोसायट्यांमधून असे प्रकार सातत्याने घडत आहेत. हि बाब वेळीच गांभीर्याने घ्या, अशा इशारा तत्कालीन काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ (Congress leader Anant Gadgil) यांनी ५-६ वर्षांपूर्वीच महिला – सुरक्षितता या विषयावर विधानपरिषदेत (Vidhan Parishad) उपस्थित करतांनासरकारला दिला होता. एवढेच नव्हे तर अशा घटनांचा तपशीलही सभागृहात मांडला होता. पोलिसांकडून (Maharashtra Police) त्या काळात मिळालेल्या माहितीनुसार अनेकदा भीतीपोटी अशा प्रकारांची मुलींकडून पोलिसांकडे तक्रारच दखल केली जात नाही, असेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते.
यावर उपाय म्हणून उंच इमारतींमधील लिफ्टला काचेची दारे अनिर्वाय (Glass door elevators) करा अशी सूचना गाडगीळ यांनी केली होती. वास्तविकता इमारतीला आग लागल्यावर लिफ्टचा वापर करावयाचा नसतो, तरीही अग्निशमनदल लोखंडी दरवाजे अनिर्वाय करतात, हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये चुकीचे आहे, हे एक आर्किटेक्ट या नात्याने गाडगीळ यांनी दाखवूनही दिले होते.
त्यावेळी तत्कालीन बांधकाममंत्री (भा. ज. प.) यांनी उंच इमारतीमधील लिफ्टमध्ये सीसीटीव्ही व काचेची दारे अनिर्वाय केली जातील, असे सभागृहात घोषितही केले होते. आज ५-६ वर्षे उलटून गेली तरीही अजून सरकारने हे बंधनकारक केलेले नाही, हे गाडगीळ यांनी निदर्शनास आणले आहे.
गाडगीळ यांनी राज्य व राष्ट्रीय महिला आयोगास (National Commission for Women) पत्र लिहून महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे अत्यावश्यक असल्याने आयोगांनी सरकारकडे याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी केली होती. तथापि राज्य महिला आयोगाच्या ( Maharashtra State Women’s commission) तत्कालीन अध्यक्षांनी हे पत्र बांधकाम मंत्र्यांना पुढे पाठवायचे एवढेच काम केले तर राष्ट्रीय महिला आयोगांच्या तत्कालीन अध्यक्षांनी गाडगीळांच्या पत्रास उत्तरही दिले नाही.
यावरून बदलापूर प्रकरणात (Badlapur Incident) जनतेचा रोष ओढवून घेणारे महायुती (Mahayuti) व एन डि ए सरकार (NDA government) महिला सुरक्षितता (women security) प्रश्न यावर गंभीर नाही हे स्पष्ट होते, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते आणि माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.