Twitter : @therajkaran
कोल्हापूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन खंडीत केलेली ५२२ किमीची आक्रोश पदयात्रा आज शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ पासून जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यापासून पुन्हा सुरू झाली.
मनोज जरांगे- पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या लढ्याचे उपोषण स्थगित झाले. या उपोषणास पाठिंबा म्हणून राजू शेट्टी यांनी २२ दिवसाची ५२२ किलोमीटरची आक्रोश यात्रा १३ व्या दिवशी स्थगित केली होती. त्या पदयात्रेस सकाळी ८ वाजता राजारामबापू साखर कारखाना साखराळे येथून सुरवात होणार आहे.
सकाळी ठिक ६.३० वाजता राजू शेट्टी निवासस्थानापासून साखराळेकडे रवाना होणार असून ८ वाजता कारखाना प्रशासनास निवेदन देवून तिथून हुतात्मा कारखाना -नागठाणे – अंकलखोप – भिलवडी व वसगडे मुक्कामी असणार आहे. दि. 7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ व्या ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होईल.