महाराष्ट्र ताज्या बातम्या

Tipu Sultan: टिपू सुलतान नावाच्या वादावर काँग्रेस–भाजपा आमने-सामने; सचिन सावंतांचा अमित साटम यांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई: काँग्रेसचे प्रवक्ते Sachin Sawant यांनी भाजप मुंबई अध्यक्ष Ameet Satam यांच्या ट्वीटवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आमचा टिपू सुलतानला कालही विरोध होता, आजही आहे आणि उद्याही राहणार,” असा दावा साटम यांनी केला होता.

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सचिन सावंत यांनी साटम यांच्यावर इतिहासाचे विकृतीकरण आणि दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे.

सचिन सावंत यांनी स्पष्टपणे आठवण करून दिले की, टिपू सुलतान यांच्या नावाने रस्ता असावा या प्रस्तावाला अनुमोदन देणारे साटम स्वतः होते, मग आज “कालही विरोध होता” असे म्हणणे हे धादांत असत्य असल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (Rashtriya Swayamsevak Sangh) ऐतिहासिक भूमिका अधोरेखित करत सावंत म्हणाले की, संघाने पूर्वी केवळ टिपू सुलतान यांची दखलच घेतली असे नव्हे, तर नव्या पिढीने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अशी भूमिका मांडली होती. संघप्रेरित प्रकाशनांमधील ‘भारत भारती’ या मुलांसाठीच्या पुस्तक मालिकेत १९७० साली टिपू सुलतानांवर स्वतंत्र पुस्तक प्रकाशित झाले होते, हेही त्यांनी नमूद केले.

“इतिहास बदललेला नाही, बदलली आहेत ती सत्तेची समीकरणे,” असे सांगत सावंत यांनी आरोप केला की, ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी इतिहासाचा सोयीस्कर वापर आणि गैरवापर केला जात आहे. सत्ता मिळवण्यासाठी भूमिका बदलणे हीच खरी दुटप्पी भूमिका असल्याचा टोला त्यांनी भाजप व संघाला लगावला.

दरम्यान, साटम यांनी आपल्या ट्वीटमध्ये काँग्रेस नेते Harshvardhan Sapkal यांच्यावरही टीका करत, “छत्रपती शिवरायांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याबद्दल त्यांनी नाक घासून जाहीर माफी मागावी,” अशी मागणी केली होती.

या वादामुळे टिपू सुलतान यांच्या नावावरून सुरू असलेले राजकारण पुन्हा एकदा तीव्र झाले असून, इतिहास, राजकीय भूमिका आणि ध्रुवीकरण या मुद्द्यांवर राज्यात नवे राजकीय रण पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात